भांडुपमध्ये 36 लाखांची वीज चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महावितरणने भांडुप परिमंडळात तब्बल 36 लाख रुपयांची वीज चोरी पकडली आहे. नऊ लाख रुपयांचे वीज बिल थकीत असलेल्या महावितरणने मेसर्स मुमताज एंटरप्रायझेस या व्यावसायिकाचे वीज कनेक्शन कापले होते. त्यानंतर सदर ग्राहकाने महावितरणच्या मुख्य केबलला बायपास जोड देत वीज पुरवठा घेतला होता. त्याची तपासणी केली असता कनेक्शन नसतानाही संबंधिताकडून वीज वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्याने जवळपास 2 लाख 66 हजार 732 युनिट विजेची चोरी केल्याचा ठपका ठेवत महावितरणने 36 लाख रुपयांचा भरणा करण्यास सांगितले. त्यास नकार दिल्याने मुमताज एंटरप्रायझेसचे ब्रिजेश प्रेमनाथ उपाध्याय, अखिलेश उपाध्याय आणि विवेक उपाध्याय यांच्यावर भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.