वर्ल्ड कपमध्ये भारत आर्मीचा टीम इंडियाला सपोर्ट

324

सामना प्रतिनिधी । लंडन

विराट कोहलीच्या हिंदुस्थानी संघाला 22 देशांतील जवळपास आठ हजार क्रिकेटप्रेमींचे पाठबळ इंग्लंडमधील वर्ल्ड कपदरम्यान मिळणार आहे. बार्मी आर्मी ज्याप्रमाणे इंग्लंडच्या क्रिकेट संघाला सपोर्ट करते अगदी त्याचप्रमाणे ‘भारतआर्मी’ टीम इंडियाचे मनोधैर्य वाढवणार आहे. हिंदुस्थानी सेना मैदानात प्रतिस्पर्ध्यांशी लढत असताना ही आर्मी स्टेडियममध्ये हातात झेंडे घेऊन, प्रेरणा देणार्‍या घोषणांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम करील.

इंग्लंडमध्ये 1999 साली वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या ‘भारत आर्मी’ला सुरुवात झाली. त्यावेळी यामध्ये फक्त चारच व्यक्तींचा समावेश होता. आता तब्बल 20 वर्षांनंतर सहा ते आठ हजार क्रिकेटप्रेमींनी या आर्मीत प्रवेश घेतलाय. यामध्ये युनायटेड किंगडममधील हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तींचा समावेश जास्त प्रमाणात दिसून येतोय.

आपली प्रतिक्रिया द्या