
भारत पेट्रोलियम कंपनीच्या मुंबई रिफायनरी मधून दिल्लीकडे जाणाऱ्या भूमिगत वाहिनीमधून डिझेल चोरी करताना आगीचा भडका उडाल्याची घटना शिळ महापे रोडवर घडली आहे.
या भूमिगत वाहिनीतून अज्ञात व्यक्तींकडून डिझेल चोरी करताना 18 सेमीची डिझेल वाहिनी फुटली आणि भडका उडून आग लागली. तब्बल तीन तासानंतर अग्निशमन दल व ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.



























































