‘भूल भुल्लैया 2’ मध्ये दिसणार ही फ्रेश जोडी, दिग्दर्शकाने केला खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अक्षय कुमार आणि विद्या बालन यांचा धमाकेदार अभिनय असणारा ‘भूल भुलैय्या ‘ हा कॉमेडी चित्रपट प्रचंड गाजला. 2007 मध्ये आलेल्या या चित्रपटाने कॉमेडी आणि भयपटाची व्याख्याच बदलून टाकली. प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा आता दुसरा भाग येत आहे. ‘भूल भुलैय्या 2’ असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांनी नुकताच या चित्रपटाच्या कथेचा खुलासा केला आहे.

‘भूल भुलैय्या 2’ मध्ये अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेता कियारा आडवाणी हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. अनीज बज्मी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाबाबत बोलताना अनीज बज्मी म्हणाले की, हा चित्रपट भूल भुलैय्या चा दुसरा भाग असला तरी कथेत कोणतेही साम्य असणार नाही. याची कथा मानसिक आजाराच्या विषयावर नसून हा एक हॉरर ड्रामा असणार आहे. तसेच ‘भूल भुलैय्या 2’ ची कथा तेथूनच सुरु होईल जिथे पहिल्या कथेचा शेवट झाला आहे.

09_10_2019-bhool_bhulaiyaa_2_19651016पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अक्षय कुमारची भूमिका असणार असल्याचे बोलले जात होते. परंतु अनीस बाज्मी यांनी  या चित्रपटात अक्षय कुमार कोणतीही भूमिका करत नसल्याचे स्पष्ट केले आहे. अक्षय कुमार आणि विद्या बालनच्या जागी कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी ही फ्रेश जोडी दुसऱ्या भागात दिसणार आहे.