मी पक्षाला विनंती करणार आहे की, आता मला विधानसभेकरता पूर्णवेळ उतरायचं आहे. त्याकरता मला त्यांनी सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी. ज्यामुळे ज्याकाही कमतरता राहिल्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.