
बिग बॉस हिंदीचे पंधरावे पर्व सध्या सुरू आहे. गेल्या काही पर्वांच्या तुलनेत हे पर्व फार काही गाजले नाही. सध्या या पर्वात अभिनेत्री तेजस्वी प्रकाश व करण कुंद्रा यांची लव्ह स्टोरी दाखवली जात आहे.
Jao kk andr jao and the way umar was teasing them what the band krlo band 🤣🤣🤣 #BiggBoss15 #UmTejRan #TejRan
pic.twitter.com/n0YyHjQzYf— SMITH’S (@tejran_bb) November 12, 2021
नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये तेजस्वी करणला बाथरुममध्ये बोलवताना दिसत आहे. आणि त्यावरून उमर रियाझ त्यांना चिडवताना दिसत आहे. खरं तर तेजस्वी तिचा विकेंडचा ड्रेस ट्राय करण्यासाठी बाथरुममध्ये गेली होती. त्यावेळी तिने त्या ड्रेसची फिटिंग दाखविण्यासाठी करणला बाथरुममध्ये बोलावले. त्यावरून उमरने त्या दोघांना चिडवत आतून कडी लावून घ्या असे म्हटले.
बिग बॉस 15’ वेळेआधीच घेणार प्रेक्षकांचा निरोप, टीआरपी मिळेना
कोटय़वधी रुपयांचा खर्च करूनही प्रेक्षकांनी कलर्सवरील बिग बॉस-15 या शोकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे वेळेआधी म्हणजे फेब्रुवारीपूर्वीच हा शो बंद करण्याच्या विचारात निर्माते असल्याची चर्चा आहे. गेल्यावर्षी आलेल्या बिग बॉसच्या-14 व्या सीजनने आजवरच्या सर्व सीजनचे टीआरपीचे रेकॉर्ड ब्रेक केले होते. मात्र बिग बॉसच्या 15व्या सीजनला सुरुवातीपासूनच फारशी कमाल दाखवता आली नाही.
बिग बॉसच्या घरात शमिता शेट्टी, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाशसारख्या बडय़ा नावांचा समावेश तसेच राकेश बापट, नेहा भसीन यांच्या वाइल्ड कार्ड एंट्रीची जादूदेखील प्रेक्षकांवर फारशी चालली नाही. गेल्या अनेक सीजनपासून सलमान खान बिग बॉसचे सूत्रसंचालन करतोय. सलमानच्या लोकप्रियतेचा या शोच्या टीआरपीला नेहमीच फायदा होतो. त्यामुळे निर्मात्यांनी सलमानला या सीजनसाठी तब्बल 500 कोटी रुपये एवढे मानधन दिले होते. तसेच बिग बॉसचे घर यंदा जंगल थीमवर आधारित असल्याने त्यासाठीही निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. तरीही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात बिग बॉस 15 सपशेल अयशस्वी ठरल्याचे दिसत आहे.


























































