
बिहार विधान परिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर यांनी गुरुवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील उपस्थित होते.






























































