
शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पोटनिवडणूकीतून भाजपने माघार घेतली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत ही माहिती दिली. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे त्यांचा अर्ज मागे घेणार असल्याचे बानवकुळे यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
“माझे पती रमेश लटके यांचे सगळ्यांशळी जिव्हाळ्याचे संबंध होते त्याची पोचपावती मला मिळाली आहे. सगळ्यांचा आशिर्वाद मिळाला आहे.हा आशिर्वाद कायम राहू दे. लोकांसाठी जे गरजेचे आहे ते सर्व काम करण्याची माझी इच्छा आहेत.” अशी प्रतिक्रीया ऋतुजा लटके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.































































