भाजप नेते, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण

भाजप नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. कौटुंबिक सहकाऱ्यांना लागण झाल्याने त्यांनीही चाचणी करून घेतली. या चाचणीत मुनगंटीवार यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

संसर्गाचे प्रमाण शोधण्यासाठी अन्य चाचण्या करून घेतल्या जात आहेत. त्यांच्यावर घरीच उपचार केले जाण्याची माहिती देण्यात आली असून घरातील अन्य सदस्यांची देखील कोरोना चाचणी केली जाणार आहे. आपल्या संपर्कात जे जे आले असतील त्यांनी कोरोना टेस्ट करावी असे आवाहन त्यांनी सोशल मीडियाद्वारे केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या