
सामना ऑनलाईन, लखनौ
बलात्काराच्या घटना भगवान रामालाही रोखता येणार नाहीत, असे खळबळजनक वक्तव्य उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंग यांनी काल केले आहे.
भगवान राम जरी आले तरी अशा घटना (बलात्कार) रोखणे शक्य नाही, असा मी छातीठोकपणे दावा करतो. समाजात नैसर्गिकपणे झालेले हे प्रदूषण आहे असे सिंग यांनी सांगितले. उन्नावमधील विनयभंगाची घटना समाज माध्यमांत प्रसारित झाली. यावर सिंग यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी वरीलप्रमाणे वक्तव्य केले. इतर माणसेसुद्धा आपल्या कुटुंबातील आहेत, हे लोकांनी मानले पाहिजे. नीतिमूल्ये असतील तर आपण हे नियंत्रित करू शकतो. घटनेद्वारे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.




























































