महिलांवरील अत्याचाराला इंटरनेट आणि स्मार्टफोन जबाबदार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, दमोह

महिलांवरील अत्याचारांना इंटरनेट आणि स्मार्टफोन जबाबदार असल्याचा दावा भाजपच्या खासदाराने केला आहे. या दोन गोष्टींमुळे पुरुष घाणेरड्या गोष्टी बघतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या भोळ्या मनावर होतो असं नंदकुमार चौहान यांनी म्हटलं आहे. मंदसौर इथे ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कारानंतर जनावराप्रमाणे अत्याचार करण्यात आले. त्यापाठोपाठ सतनामध्येही लहान मुलीवर बलात्कार झाला. मंदसौरच्या घटना ऐकल्यानंतर पाषाणह्रदयी व्यक्तीही हादरून गेल्या आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर बोलताना चौहान यांनी हे विधान केलं आहे.

नंदकुमार चौहान हे भाजपमधील वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. कठुआ बलात्कार प्रकरणानंतर जो आगडोंब संपूर्ण देशात उसळला होता. याबाबत बोलताना चौहान यांनी हे पाकिस्तानने रचलेले षडयंत्र असल्याचं धक्कादायक  विधान केलं होतं.