
ब्लॅकमेलिंग करणाऱया माकडाविषयी ऐकलंय का? हिमाचल प्रदेशाच्या सिमला शहरात अशाच एका माकडाने सर्वांना हैराण केलेय. ब्लॅकमेलिंग करणारे माकड अशी त्याची ओळख बनलेय. तो रस्त्यावरून जाणाऱया-येणाऱया लोकांचा चष्मा खेचून घेतो. त्याला काही खाणंपिणं दिलं तरच तो चष्मा परत करतो. वन विभागाला या माकडाच्या अनेक तक्रारी गेल्या होत्या. अखेर वन्य जीव विभागाने ब्लॅकमेलर माकडाला जंगलात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिमल्यातील हे माकड पर्यटकांचा चष्मा, गॉगल खेचण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करतो. त्याची सवय दिवसागणिक वाढत चालली होती. अखेर सिमल्याच्या वन्य जीव विभागाने त्याचा बंदोबस्त करायचे ठरवले.
सध्या माकडाला टुटीकेंडी प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आले आहे. माकडाच्या सवयी बघता त्याला शहरातील मालरोड परिसराऐवजी येत्या दोन दिवसांत जंगलात सोडले जाणार आहे.























































