मुंबईकरांच्या एक कोटी लसींसाठीचे टेंडर रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला एक कोटी कोरोना लसींचे डोस पुरवण्यासाठी पालिकेने काढलेले ग्लोबल टेंडर आज रद्द करण्यात आले आहे. निविदेला प्रतिसाद दिलेल्या नऊ कंपन्यांमधील एकही कंपनी उत्पादक कंपनीसोबतचे विश्वासार्ह करारपत्र सादर करू शकली नसल्याने सर्व कंपन्या बाद ठरवण्यात आल्या आहेत. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी ही माहिती दिली.

मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. मात्र पुरेसे डोस मिळत नसल्याने वांरवार लसीकरणाला बेक लागत आहे. त्यामुळे पालिकेने 12 मे रोजी कोरोना लसींचे डोस पुरवण्यासाठी ग्लोबल टेंडर काढले. या टेंडरला प्रतिसाद दिलेल्या संभाव्य पुरवठादारांना लसींचा पुरवठा करण्यासाठी पहिल्यांदा 25 मेपर्यंत आणि दुसऱयांदा 1 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यामध्ये सुरुवातीला एकूण दहा कंपन्यांनी निविदेला प्रतिसाद दिला. यातील एका कंपनीने माघार घेतल्याने नऊ पंपन्यांमध्ये लस पुरवठय़ासाठी स्पर्धा होती. या कंपन्यांसोबत ऑनलाइन चर्चाही सुरू होती. किती दिवसांत पुरवठा होईल, किती संख्येने पुरवठा होईल, दर व रक्कम अधिदान करण्याच्या अटी-शर्ती यावर चर्चा सुरू होती. या पंपन्या स्वतः उत्पादक नव्हत्या, तर उत्पादकाकडून डोस घेऊन पुरवणार होत्या. मात्र संबंधित उत्पादक आणि पुरवठादार पंपनी यांच्यातील लसींच्या पुरवठय़ाबाबतचे करारपत्र विश्वासार्ह वाटत नसल्याने सर्व पंपन्या बाद ठरवण्यात आल्या. शिवाय पंपन्यांनी सादर केलेले कागदपत्रही अपूर्ण होते.

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजचा ‘बेस्ट’ पर्याय
z मुंबईसाठी पुरेशा लसींचा पुरवठा करण्यासाठी रशियन लसींचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजसोबत चर्चा सुरू असल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले. यानुसार जूनअखेरपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर पालिकेला 50 हजार लसींचा साठा मिळणार आहे.
z स्पुटनिकची ही लस साठवणुकीसाठी उणे 0.18 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असणार आहे. पालिकेच्या कांजूरमार्ग कोल्ड स्टोरेज सेंटरमध्ये ही व्यवस्थाही आहे. प्रायोगिक तत्त्वावर हे डोस मिळाल्यानंतर मोठय़ा संख्येने डोस घेण्यात येणार आहेत. या लसींचे दर, पुरवठय़ाचे प्रमाण याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.

केंद्रीय स्तरावरही प्रयत्न सुरू

ग्लोबल टेंडर यशस्वी ठरले नसले तरी केंद्रीय स्तरावर काही उत्पादक, पुरवठादार कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. आठवडाभर यावर लक्ष ठेवले जाईल. मात्र सद्यस्थितीत पुन्हा ग्लोबल टेंडर काढले जाणार नाही. शिवाय डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजसोबतही चर्चा सुरू असून जुलै-ऑगस्टमध्ये एक कोटी डोस मिळाल्यास लसीकरणात कोणताही अडथळा येणार नाही, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.