महापालिका आयुक्तांची राजावाडी रुग्णालयाला भेट

महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी आज राजावाडीतील सेठ व्ही. सी. गांधी आणि एम. ए. व्होरा म्युनिसिपल जनरल हॉस्पिटलला भेट दिली. डॉ. चिंतन दोशी आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली अस्थिरोग विभाग आणि अनुष्का फाऊंडेशनच्या वतीने विकृतीपासून गतिशीलतेपर्यंत हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत क्लबफुटवर उपचार घेतलेल्या लहानग्यांची डॉ. गगराणी यांनी भेट घेतली. राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारती एच राजुलवाला यांनी पालिका आयुक्तांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी अनुष्का फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक प्रेमनारायण यांच्या कार्याचे काwतुक केले. याप्रसंगी उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सच्चिदानंद पायन्नावर आणि डॉ. नंदन कामत उपस्थित होते.