बाप्पाच्या आगमनासाठी पालिका सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने चौपाटय़ांसह गणेश विसर्जन स्थळांवर सर्व सुविधांनी युक्त अशी व्यवस्था केली आहे. बाप्पाच्या आगमनासाठी पालिकेची सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.

या सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये आणि गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून सोमवारी महापौर आणि उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी मुंबई शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांतील विविध चौपाटय़ा आणि विसर्जन स्थळांना भेट दिली.

महापालिकेचे सर्व संबधित विभाग गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी झटत असून सर्वसामान्य मुंबईकरांनीदेखील पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौरांनी केले. गणेशमूर्ती विसर्जन स्थळांवर अतिरिक्त तराफे, बोटी, जीवरक्षक, मोटरबोट, रुग्णवाहिका, आदींची पुरेशी व्यवस्था पालिकेने केल्याचे उपमहापौरांनी सांगितले.