थर्टी फर्स्टच्या पाटर्य़ांवर पालिकेचा वॉच, 100 भरारी पथके; पोलिसांच्या सहकार्याने कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हेरिएंट ओमायक्रोनचा धोका असताना मुंबईत आतापासूनच वर्षअखेरच्या पाटर्य़ांची रेलचेल सुरू झाल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे गर्दीमुळे होणाऱ्या रुग्णवाढीचा धोका टाळण्यासाठी पालिकेने प्रत्येक वॉर्डात 2 ते 5 भरारी पथके नेमून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नियुक्ती करण्यात येणाऱ्या 100 पथकांच्या माध्यमातून कोरोना खबरदारीचे नियम मोडल्याचे निदर्शनास आल्यास पोलिसांच्या सहाय्याने कठोर कारवाई केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी अजूनही दररोज सुमारे 150 ते 250 पर्यंत कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. असे असताना दक्षिण आफ्रिकेसह युरोपीय देशांमध्ये आलेल्या कोरोना व्हेरिएंट ओमायक्रोनचाही धोका असल्याने काळजी घेण्याची गरज आहे. असे असताना अनेक ठिकाणी आयोजित कार्यक्रम, पाटर्य़ांमध्ये कोरोना खबरदारीचे नियम मोडले जात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, नियम मोडणाऱ्यांमध्ये अनेक सेलिब्रिटींचाही समावेश असल्याचे समोर आल्याने पालिकेने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

रोख दंड, कारवाई होणार

कोरोना नियंत्रणात आल्यामुळे सद्यस्थितीत हॉलमधील कार्यक्रमांना 50 टक्के उपस्थितीत तर मोकळय़ा जागेतील कार्यक्रमांना 25 टक्के उपस्थितीत परवानगी देण्यात येत आहे. मात्र हे नियम सर्रासपणे मोडले असल्याचे निदर्शनास येत आहे.

50 टक्के उपस्थितीच्या जागी 200 टक्के उपस्थिती असून प्रचंड गर्दीही होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे कार्यक्रमांना परवानगी देताना नियमांच्या अंमलबजावणीचे निर्देश देऊनच परवानगी द्यावी अशा सूचना महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर हॉटेल, रेस्टॉरंट, हॉल, पब, पाटर्य़ांच्या ठिकाणी पालिकेचे अधिकारी पोलिसांसह सरप्राइज व्हिजिट करणार आहे. यावेळी मास्क घातलेले नसल्यास, गर्दी आढळल्यास रोख दंड पिंवा साथरोग कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.