
रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘अॅनिमल’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. ‘अॅनिमल’मध्ये अभिनेता बॉबी देओलने खलनायकाची भूमिका साकारली आहे. प्रेक्षक बॉबीच्या अभिनयाने अवाक झाले आहेत. प्रेक्षकांचे प्रेम बघून बॉबी भावूक झाला.
बॉबीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत तो प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमाविषयी बोलताना दिसतो. हे सगळे झाल्यानंतर गाडीकडे जात असताना बॉबी भावूक होतो आणि त्याला अश्रू अनावर होतात. बॉबी गाडीत बसूनही रडताना दिसतो. बॉबी म्हणतो, चित्रपटाला जितके प्रेम मिळतेय ते पाहून वाटते की, मी स्वप्न पाहतोय. तुम्हा सर्वांचे आभार.
‘अॅनिमल’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी 63.8 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशीही कमाईचे आकडे वरच राहिले. दुसऱया दिवशी 66 कोटी कमावले. 100 कोटींचा आकडा चित्रपटाने कधीच पार केला आहे.































































