
लातूररोड येथील रेल्वे स्थानकावरील एक नंबर प्लँटफार्मवर अंदाजे चाळीस वर्षीय एका अनोळखी पुरूषाचा मृतदेह सापडला आहे. संबंधित नातेवाईकांनी परळी रेल्वे पोलीस स्टेशनशी संपर्क साधावे असे आवाहन तपासिक पोलीस हवालदार प्रल्हाद डफडे यांनी केले आहे .
लातूररोड येथील रेल्वे स्थानकात दोन दिवसापूर्वी अंदाजे चाळीस वर्षीय अनोळखी पुरूष मृत अवस्थेत आढळून आला आहे. मृताची उंची 5.6 इंच असून त्याचा रंग गहुवर्ण आहे. त्याच्या डाव्या हातावर मराठीतून साविञा व उजव्या हातावर रामदास साविञा असे गोंदलेले आहे. मृताजवळ कोणताही ओळखीचा पुरावा आढळून आला नाही .परळी येथील रेल्वे पोलीस हवालदार प्रल्हाद पुंडलिक डफडे यांनी या घटनेची फीर्याद रेल्वे पोलिस स्टेशन परळी येथे दिली. घटना स्थळाचा पंचनामा करण्यात आला असून अकस्मात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .तर मृतावर चाकूर येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात श्वविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांना ओळख पटवण्यासाठी लातुर येथील विलासराव देशमुख शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील शीतगृहात ठेवण्यात आला आहे . .






























































