
आमीर खान यांना पहिली पत्नी रिना दत्ता हिच्यापासून दोन मुले आहेत. दुसरी पत्नी किरण राव मुलासह कुठे भटकेल, याची त्याला चिंता नाही. पण आजोबा आमीर तिसरीच्या शोधात आहेत. हा या अभिनेत्याचा संदेश आहे का, असा प्रश्न उपस्थित करत हिंदुस्थानची लोकसंख्या वाढवण्यात अभिनेता आमीर खानसारखे लोक जबाबदार आहेत. हे देशाचे दुर्दैव आहे, अशी मुक्ताफळे भाजपचे मध्य प्रदेशच्या मंदसौरचे खासदार सुधीर गुप्ता यांनी उधळली आहेत. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त यांनी भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकसंख्या नियंत्रण धोरण जाहीर केले तर आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमा यांनी लोकसंख्या नियंत्रणावर धोरण तयार करणार असल्याचे म्हटले आहे. लोकसंख्या नियंत्रणाचा हा मुद्दा पकडूनच सुधीर गुप्ता यांनी ट्विट करत आमीर खान याला लक्ष्य केले आहे.
























































