गौहर खानच्या घरी हलणार पाळणा, व्हिडीओ शेअर करून दिली माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकिकडे बॉलिवूडमध्ये लगीनघाईच्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे अनेकांनी आपल्या वैवाहिक जीवनात नवीन पाहुण्याचं स्वागत केलं आहे. आलिया भट, बिपाशा बासू यानंतर आता गौहर खान हिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

बिग बॉसच्या सातव्या पर्वाची विजेती आणि बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान हिच्या घरी पाळणा हलणार आहे. दोन वर्षांपूर्वी 25 डिसेंबर रोजी गौहरने झैद दरबार याच्याशी लग्नगाठ बांधली होती. गौहर खान आणि झैद यांच्या लग्नानंतर लगेच 3 महिन्यात गौहार गरोदर असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. यावर गौहर चांगलीच भडकली होती.

आता लग्नाला दोन वर्षं पूर्ण होत असताना तिने आपल्या आयुष्यातल्या या नवीन पर्वाबाबत सोशल मीडियावर शेअर करत माहिती दिली आहे. एक कार्टूनचा व्हिडिओ शेअर करत ‘गौहर झैद आणि +1’ असं सांगत तिने ही पोस्ट शेअर केली आहे. या सुखद प्रवासात तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, अशी कॅप्शनही तिने दिली आहे. या गोड बातमीमुळे गौहरच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

गौहर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपट आणि सीरिजमध्ये काम केलं आहे. ती तिच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यासाठी नेहमीच चर्चेत असते. गौहर खान नुकतीच नेटफ्लिक्सवर ‘14 फेरे की कहानी’ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती.

पाहा व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

A post shared by Gauahar Khan (@gauaharkhan)