
बॉलीवूडचे ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांचा उद्या बुधवार, 11 ऑक्टोबर रोजी 81 वा वाढदिवस. त्यांच्या असंख्य चाहत्यांसाठी हा दिवस म्हणजे एखाद्या उत्सवाप्रमाणेच असतो. या वयातही सेपंद अन् सेपंद बिझी असणाऱया या महानायकाचा उत्साह आजच्या तरुण कलाकारांना लाजवेल असाच आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून अमिताभ बच्चन सध्या सूत्रसंचालन करत असलेल्या ‘केबीसी-15’च्या सेटवर त्यांना खास सरप्राईज मिळाले. हे सरप्राईज पाहून त्यांचे डोळे पाणावले.
अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवस अविस्मरणीय करण्यासाठी केबीसीच्या बुधवारी रात्री प्रसारित होणाऱया विशेष भागात अनेक सरप्राईज असणार आहेत. सीझन- 11 ची करोडपती बबिता तावडे, सीझन-13 ची करोडपती विजेती हिमानी बुंदेला आणि यंदाच्या सीझनचा पहिला करोडपती जसकरण सिंह यांनी या सोहळय़ात सहभागी होऊन या लाडक्या सुपरस्टारला शुभेच्छा दिल्या. चाहत्यांच्या प्रेमामुळे भारावलेले अमिताभ बच्चन म्हणाले, “एरव्ही मी इकडे येणाऱया स्पर्धकांना टिश्यू पेपर देत असतो, पण आता माझ्यावर ती वेळ आली आहे. या मंचावर माझा जो वाढदिवस साजरा होतो, तो सगळय़ात उत्तम असतो.’’
सुरुवातीला सरोद वादक ‘पद्मविभूषण’ उस्ताद अमजद अली खान गाण्यांची एक मेडली सादर करून वातावरण आल्हाददायक केले. त्यानंतर सुपरस्टार चिरंजीवी, अनुपम खेर, विद्या बालन, विकी कौशल आणि बोमन इराणी आदींनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
शोले-जंजीरच्या रेकॉर्डला विक्रमी बोली
अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चित्रपटाच्या पोस्टर्सपासून ते खास पह्टोपर्यंत विविध वस्तूंचा लिलाव Rivas & Ivesया ऑक्शन हाऊसतर्फे करण्यात आला होता. या लिलावाला फॅन्सनी उदंड प्रतिसाद दिला. अलाहाबाद मतदारसंघातून लोकसभेच्या राजकीय प्रचारात वापरल्या गेलेल्या अमिताभ बच्चन यांच्या प्रमोशनल कार्ड 67,200 रुपयांना विकले गेले. ‘जंजीर’, ‘जमीर’, ‘दीवार’, ‘राम बलराम’ अशा चित्रपटांच्या शोकार्ड्स आणि ऑफसेट अशा सर्व वस्तूंना 50 हजारांची बोली लावण्यात आली. याशिवाय ‘शोले’ चित्रपटाशी संबंधित वस्तू चांगल्या किमतीला विकल्या गेल्या.




























































