अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट; नऊ विद्यार्थी ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अफगाणिस्तानात सोमवारी दुपारी एका शाळेजवळ शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. त्यात नऊ विद्यार्थी ठार झाले तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर ही घटना घडली. नांगरहार येथील लालेपूरमधील शाळेतील विद्यार्थ्यांच्या जेवणाचे सामान घेऊन जाणाऱ्या गाडीत बॉम्ब ठेवण्यात आला होता असे तालिबान गव्हर्नर कार्यालयाकडून सांगण्यात आले.