चंद्रकांत पाटीलांकडून सीमावासियांचा अपमान! जितेंद्र आव्हाडांचा ट्विटरवरून हल्लाबोल

कर्नाटकातील भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यामधील 40 गावांवर आम्ही दावा सांगणार आहोत, असे विधान केल्यानंतर महाराष्ट्रात आणि सीमाबांधवांमध्ये संतापाची लाट उसलळी आहे. राज्य सरकारच्या सीमा बांधवांसंदर्भातील धोरणांवर विरोधकांनी आक्रमक होत टीका केली आहे. अशातच राज्याचे मंत्री चंद्रकात पाटील यांनी बेळगावचा उल्लेख बेळगावी असा केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘चंद्रकांत पाटील, बेळगावी म्हणत तुमची मानसिकता काय आहे सीमा प्रश्ना बाबत तुम्हीच स्पष्ट केलीत… हा सीमा वासियांचा आपमान आहे’

दरम्यान चंद्रकात पाटील यांनी ट्विट केले आहे की, ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बेळगावी येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, अशी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका आहे. त्यानुसार मी आणि समन्वयक मंत्री शंभुराज देसाई 3 डिसेंबर रोजी दिवसभर बेळगाव येथे जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत. भेटूया, चर्चेतून नक्कीच मार्ग निघतो!’