
हिंदुस्थानची युवा बॉक्सर प्रीती पवार हिने आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला बॉक्सिंग 54 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. उपांत्य लढतीत चिनी प्रतिस्पर्धीकडून 5-0 फरकाने हार पत्करावी लागल्याने प्रीतीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 19 वर्षीय प्रीती पवारला बॉक्सिंगचा वारसा लाभला आहे. तिचे वडील आणि काका हे बॉक्सिंग कोच आहेत. त्यांनीच प्रीतीला बॉक्सिंगसाठी प्रवृत्त केले.
आशियाई पदक तालिका
देश सुवर्ण रौप्य कास्य एकूण
चीन 160 89 46 295
जपान 33 46 50 129
द.कोरिया 32 42 64 138
हिंदुस्थान 15 26 28 69
उझबेकिस्तान 14 15 21 50
तैपैई 12 10 18 40
थायलंड 10 11 19 40
उ. कोरिया 7 10 6 23
बहरीन 7 1 4 12
हाँगकाँग 6 15 24 45