
बॉक्सिंगचे धडे देणाऱ्या एका प्रशिक्षकानेच तरूणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कोंढव्यातील लुल्लानगरमध्ये घडली आहे. रॉबीन सायमन अॅन्थनी (वय28, रा. कॅम्प) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 19 वर्षीय तरूणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फिर्यादी तरूणी लुल्लानगरमधील एका बॉक्सिंग केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी जात होती. तीन दिवसांपुर्वी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास तरूणी बॉक्सिंग केंद्रात असताना रॉबीनने तिचा विनयभंग केला. त्यामुळे तरूणी निघून घरी चालली होती. त्यावेळी रस्त्यात पाठलाग करून रॉबीनने तरूणीसोबत अश्लिल वर्तन करून पुन्हा विनयभंग केला. याप्रकरणी कोंढवा पोलीस तपास करीत आहेत.





























































