भाजपमध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण! ब्राह्मण महासंघाचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्र्याऐवजी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली यावरून फडणवीस समर्थकांत कमालीची नाराजी आहे. त्यातच आता ब्राह्मण महासंघाने भाजपमध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आधी नितीन गडकरी आणि आता देवेंद्र फडणवीस यांचं पद्धतशीरपणे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून खच्चीकरण करण्यात आल्याचे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानपदाच्या स्पर्धांमधून हटकण्यासाठी नितीन गडकरी यांचे चारित्र्यहनन करून त्यांचे खच्चीकरण करण्यात आले. त्यानंतर गेल्या तीन कर्षांपासून भाजपमधील तथाकथित नेतेमंडळींनी देवेंद्र फडणकीस यांना षड्यंत्र आखत योजनाबद्ध पद्धतीने सत्तेपासून लांब ठेकण्यात आले, असा आरोप ब्राह्मण महासंघाने केला आहे.