विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलचा सामना स्वित्झरलँडशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मॅास्को

फुटबॅाल विश्र्वचषक स्पर्धेत आज तीन सामने खेळले जाणार आहेत. पहिला सामना कोस्टारिका आणि सर्बिया, दुसरा सामना जर्मनी आणि मेक्सिको तिसरा सामना ब्राझील आणि स्वित्झरलँड यांच्या मध्ये खेळला जाणार आहे. या टिम मध्ये ब्राझील एकमेव असा संघ आहे ज्यांने आत्तापर्यंत सर्व विश्वचषक खेळले आहेत. ब्राझील संघ हा ८० वर्षामध्ये एकादाही सलामीचा सामना हरलेला नाही.

ब्राझील-स्वित्झरलँड विश्वचषकामध्ये आतापर्यंत फक्त एकवेळा आमने सामने खेळले आहेत. १९५० मध्ये या दोन्ही संघात झालेला सामना २-२ गोलने बरोबरीत सुटला होता. ब्राझीलनं आत्तापर्यंत ५ वेळा विश्वविजेतेपदाचा मान पटकविला आहे. ब्राझीलचा संघ गेल्या १२ विश्वचषकांमध्ये ग्रुप स्टेजचा एकही सामना हरलेला नाही. ब्राझीलच्या संघान १८ सुरूवातीच्या सामन्या पैकी १६ सामने जिंकले आहेत. १९३४ ब्राझीलला मध्ये स्पेनने ३-१ अशा गोल फरकानं हरविलं होतं. स्वित्झरलँड ११ व्या वेळेस विश्वचकांमध्ये भाग घेत आहे. स्वित्झरलँडनं ३३ सामन्यापैकी आतापर्यंत ११ सामने जिकंले असून त्यांना ११ वेळेस पराभवाचा सामना करावा लागला आहे. ६ वेळा ते सामना ड्रॉ करण्यात यशस्वी ठरले आहेत.

कोस्टारिका आणि सर्बिया पहील्यादांच आमने – सामने

कोस्टारिका आणि सर्बिया आता पर्यंत विश्वचषकांमध्ये पहील्यादांच आमने – सामने खेळत आहेत. कोस्टारिकाचा हा पाचवा विश्वचषक आहे. आतापर्यंत कोस्टरिकाने ४ पैकी ३ सलामीचे सामने जिंकले आहेत. २००६ मध्ये जर्मनी विरूध्द त्यांना २-४ अशा फरकानं पराभवाला समोर जाव लागलं होत.

जर्मनीला कधीच हरू शकला नाही मेक्सिको

जर्मनी आणि मेक्सिको विश्वचषक स्पर्धेत चौथ्या वेळेस आमने सामने खेळतील. तीन वेळेस जर्मनीची संघानं मेक्सिको विरुद्ध विजय मिळवला आहे. आत्तापर्यंत जर्मनी आणि मेक्सिको यांच्यात ११ आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. त्यामध्ये मेक्सिकोच्या संघान आतापर्यंत केवळ एकदाच विजय मिळवला आहे.

नेमारमुळं ब्राझीलचं मनोबल उंचावल

विश्वचषकामध्ये नेमार आपला शेवटचा सामना २०१४च्या विश्वचषकात उपांत क्वार्टर फायनलमध्ये कोलंबिया विरुद्ध खेळला होता. हा सामना ब्राझीलनं जिंकला होता. पंरतु नेमार या सामन्यामध्ये जखमी झाला होता. ब्राझील च्या संघात सध्या गेल्या विश्वषकांमध्ये खेळलेल्या खेळाडू पैकी सहा खेळाडू आहेत. तीन महिन्यांच्या आरामानंतर संघात परलेल्या नेमार कडून संघाला चांगल्या खेळाची अपेक्षा आहे.

आजचे सामने वेळ

पहिला सामना कोस्टारिका आणि सर्बिया सांयकाळी ५.३० वा.
दुसरा सामना जर्मनी आणि मेक्सिको सांयकाळी ८.३० वा
तिसरा सामना ब्राजील आणि स्वित्झलँड सांयकाळी ११.३०वा