Thane news – 25 लाखांच्या लाच प्रकरणी शंकर पाटोळे अखेर निलंबित

पालिका मुख्यालयात १५ लाखांची लाच स्वीकारणाऱ्या उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यावर पालिका प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केल्यानंतर २ ऑक्टोबरपासून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. आज महापालिका आयुक्त सौरभराव यांनी आदेश जारी केले आहेत.

  • अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई केल्यानंतर शिस्तभंगाची कारवाईही सुरू करण्यात आली आहे.
  • महापालिकेने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर शंकर पाटोळे यांच्या जागी उमेश बिरारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस कोठडीत वाढ

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता तपास पथकाने आणखी कोणाचा सहभाग होता का, इतर कोणासोबत खासगीत चर्चा केली आहे का, याबाबत तपासासाठी पोलीस कोठडीत वाढ मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने पाटोळे यांना आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.