
सामना प्रतिनिधी, माढा
हौसेला मोल नसतं या युक्ती चा प्रत्यय काल उपळाई व परिसरातील ग्रामस्थांनी घेतला वरपक्षाने वधूला लग्न घरी आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर वधू पक्षाच्या घरी पाठविण्यात आल्यानं माढा तालुक्यातील पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला आहे.
माढा जवळील उपळाई या गावातील कूर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक शशिकांत उर्फ दीपक रामचंद्र देशमुख यांच्या तृतीय कन्येचा विवाह कासेगाव (पंढरपूर) येथील प्रगतशील शेतकरी प्रकाशराव अप्पासाहेब बाबर यांचा मुलगा नितीन यांच्याशी 9 जून रोजी संपन्न झाला. त्या निमित्ताने लग्नं घरी वधूला आणण्यासाठी वरपक्षाने हेलिकॉप्टर पाठवून वधूला आणल्यानंतर या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे
“या आनंददायी प्रसंगी मला खूप आनंद होत आहे मला मुलगी असल्याचा अभिमान वाटतोय वरपक्षाने स्त्री म्हणून सन्मान केल्याने शेतकरी कुटुंबातील मुलगी शेतकरी कुटुंबात दिल्याचा आनंद झाला आहे”
– शशिकांत उर्फ दीपक रामचंद्र देशमुख





















































