मांडकुली खोदाडेश्वर व रान बांबुळी ओरोसवर्दे  पुलाच्या कामास मंजुरी, आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ  

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून व आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून कुडाळ तालुक्यातील मांडकुली खोदाडेश्वर दरम्यान कर्ली नदीवर पूल व रान बांबुळी ओरोसवर्दे रस्त्या मधील कॉजवेच्या ठिकाणी उंच पातळीचा पूल बांधण्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे. यामुळे कुडाळ तालुक्यातील अनेक गाव एकमेकांना जोडणार जाणार आहेत.

हा पूल व्हावा यासाही तेथील ग्रामस्थांची गेल्या  काही  वर्षांपासून मागणी  होती. या मागणीची दखल आमदार वैभव नाईक यांनी घेऊन  सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्याकडे पाठपुरावा करून हा पूल मंजूर करून घेतला आहेत. मांडकुली खोदाडेश्वर रस्त्या दरम्यान कर्ली  नदीवर पूल बांधण्यासाठी 4 कोटी 3 लाख रु निधी मंजूर  करण्यात आला असून यामुळे मांडकुली  केरवडे, घावनळे, माणगाव, साळगाव हे गाव जोडले जाणार आहेत.

तर रानबांबुळी, ओरोसवर्दे  रस्त्या मधील कॉजवेच्या ठिकाणी उंच पातळीचा पूल बांधण्यासाठी 1 कोटी 3 लाख  हजार रुपयांचा निधी मंजूर  करण्यात आला असून या पुलामुळे आरोस वर्दे भडगाव कडावल हे गाव जोडले जाणार आहेत. लवकर या पुलाच्या कामाचे भूमिपूजन करून पुलाच्या कामास सुरवात करण्यात येणार असल्याचे आमदार वैभव नाईक  यांनी सांगितले आहे.