डायनासोरच्या पायांचे शेवटचे ठसे सापडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाकाय डायनासोरच्या पायांचे अखेरचे ठसे शोधण्यात इंग्लंडच्या संशोधकांना यश आले आहे. इंग्लंडच्या केंट परिसरातील फोल्कस्टोन येथे ठसे आढळले आहेत. ते एकूण सहा प्रजातींच्या डायनासोरच्या पावलांचे ठसे असून 11 कोटी वर्षे जुने आहेत. ब्रिटनच्या आसपास फिरणाऱया शेवटच्या डायनासोरच्या या पाऊलखुणा असल्याचा अंदाज आहे.

डायनासोरचे संशोधन हँस्टिंग्ज म्युझियम अँड आर्ट गॅलरी आणि युनिव्हर्सिटी ऑफ पोर्ट्समाऊथच्या संशोधकांनी केले आहे. फोल्कस्टोनच्या ज्या भागात खडकांवर जोरदार वारा आणि समुद्री लाटा आदळतात, तिथे ठसे सापडले आहेत. मोठमोठय़ा खडकांमध्ये डायनासोरच्या पावलांचे ठसे उमटले आहेत. त्या खडकांमधून जीवाश्म बाहेर येत आहे. काही ठशांमध्ये तर पाणी जमा झालेलं आहे. प्रा. डेव्हिड मारिटल यांच्या मते हे खूप अद्भुत संशोधन आहे. या भागात डायनासोर फिरले होते. त्यानंतर त्यांची प्रजाती संपुष्टात आली आहे.