ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट, पुन्हा लॉकडाऊन

प्रातिनिधिक फोटो

ब्रिटनमध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून देशाची वाटचाल पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने सुरु आहे. लवकरच निर्बंध जाहीर करण्यात येतील असे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी जाहीर केले आहे.

ब्रिटनमध्ये आतापर्यंत 398625 जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यातील 41788 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर ब्रिटनमधील व्यवहार या महिन्यात सुरु करण्यात आले होते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून रोज पाच हजारांवर रुग्ण संख्या वाढत आहे. कोरोनाची ही दुसरी लाट असल्याचे वैधकीय तज्ञांचे म्हणणे आहे. पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावून देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्याचे संकेत दिले.

काय आहेत निर्बंध
– खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्यावे.
– सरकारी कार्यालयांत कमी उपस्थिती.
– हॉटेल्स, बार, रेस्टोरंट रात्री दहा वाजता बंद होणार.
– लोकांनी कमीत कमी घराबाहेर पडावे.
– कोरोना नियमांचे काटेकोर पालन आवश्यक.

आपली प्रतिक्रिया द्या