
सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) सतर्कतेमुळे मोठा घातपात टळला आहे. पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यात आतंरराष्ट्रीय सीमेनजीक तीन एके-47 रायफलसह दोन एम-16 रायफल, दोन पिस्तूल आणि वेगवेगळ्या प्रकारची 168 काडतुस असा मोठा शास्त्रसाठा बीएसएफने जप्त केला आहे. त्यानंतर जवानांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले असून हा शस्त्रसाठा पाकिस्तानमधून पंजाबमध्ये कुणासाठी पाठवला होता याबाबत तपास सुरू असल्याचे बीएसएफने ट्विट केले आहे.
On 12 Sept’ 2020, alert BSF troops foiled attempt by anti-national elements & recovered 03 AK-47 rifles with 06 magazines & 91 rds, 02 M-16 Rifles with 04 magazines & 57 Rds and 02 Pistols with 04 magazines & 20 rds along Indo-Pak border of Abohar, Distt Ferozepur, Punjab.
(1/n) pic.twitter.com/dYgCh3sM7q— BSF (@BSF_India) September 12, 2020
फिरोजपूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवरील नवी गजनिकला चौकीजवळ शनिवारी सकाळी सात वाजता बीएसएफ जवानांना पिवळ्या रंगाची प्लास्टिक बॅग आढळून आली. त्यानंतर जवानांनी आजूबाजूला पाहणी केली असता जवळच शस्त्रांनी भरलेली बॅग आढळून आली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्र असल्याने जवानांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. या कारवाईबाबत बीएसएफच्या महासंचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान बीएसएफने पंजाबमध्ये काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून हिंदुस्थानात घुसखोरी
करणाऱया पाच जणांना ठार केले होते.




























































