
हॉकी वर्ल्ड कपमध्ये निराशाजनक कामगिरीनंतर रिक्त झालेल्या प्रशिक्षकपदाच्या जागेसाठी अर्जेंटिनाचे मॅक्सीमिलानो पॅलडास आणि डचमन सिगफ्राइड ऐकमन या दोघांची नावे शर्यतीत सर्वात पुढे आहेत. हॉकी इंडियाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार परदेशी प्रशिक्षकांची वर्णी लावली जाणार असून हिंदुस्थानी प्रशिक्षकाचा विचार केला जाणार नसल्याचे कळले आहे.
यंदाच्या हॉकी वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानी संघ चक्क नवव्या क्रमांकावर फेकला गेला होता. त्यामुळे वर्ल्डकप संपताच प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हॉकी इंडिया दोन-तीन उमेदवारांच्या संपका&त आहे आणि हिंदुस्थानी हॉकीचा दर्जा उंचावण्यासाठी सर्वोत्तम प्रशिक्षकाची निवड केली जाणार असल्याचे सांगितले. पॅलडास यांच्याशिवाय पाकिस्तानी हॉकीचे प्रशिक्षक ऐकमन हेसुद्धा दावेदार आहेत. त्यांना पाकिस्तान हॉकी महासंघाने दहा महिने मानधन दिलेले नाही.






























































