माढा- तुरीच्या पिकात लावलेला 133 किलो गांजा जप्त, 2 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुरीच्या पिकात लावलेली गांज्याची 133 किलो वजनाची अंदाजे 6 लाख 59 हजार रूपये किंमतीची झाडे माढा पोलिसांनी बावी (ता.माढा) जप्त केली. याप्रकरणी बंडू औदुंबर मोरे (48) आणि जरीचंद विश्वनाथ कुंभार या शेतकऱ्यांविरोधात माढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बावी येथील शेतात तुरीच्या पिकात गांज्याची झाडे लावली असल्याची खबर माढा पोलिसांना मिळाली. त्यानुसार आज दुपारी साडेबाराच्या सुमारास पोलिसांनी बावी येथे पहाणी केली असता बंडू मोरे, जरीचंद कुंभार यांनी आपल्या जमिनीमध्ये तुरीचे पिकांमध्ये बेकायदा गांजाची लागवड केल्याचे आढळले. पोलिसांनी 133 किलो 900 ग्रॅम वजनाची 6 लाख 59 हजार रुपयांचा गांजा जप्त केला. या प्रकरणी माढा पोलिसात गुन्हा दाखल झाला असुन अधिक तपास सपोनि अमुल कादबाने हे करीत आहेत.