हिंदुस्थानी हद्दीत सॅटेलाइटफोनचा वापर करणाऱ्या कॅप्टनसह व्यावसायिक ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुस्थानच्या जल हद्दीत थुराया सॅटेलाइट फोनच्या वापरावर बंदी असतानाही दुबईहुन मुंबईत येणाऱया एका थग जहाजाच्या कॅप्टनने मालकाशी संपर्प साधण्यासाठी त्या सॅटेलाइट फोनचा वापर केला. हिंदुस्थानी सेटेलाईट यंत्रणेने थुरायाचा झालेला वापर पकडला आणि त्याआधारे यलोगेट पोलिसांनी बंदी असलेल्या त्या सॅटेलाइट फोनचा वापर करणाऱया कॅप्टनसह एका व्यावसायिकावर कायदेशीर कारवाई केली.

२००८ साली पाकिस्तानी दहशतवादी कसाब व त्याचे साथीदार मुंबईत घुसले होते तेव्हा त्यांनी थुराया सेटेलाईट फोनचा वापर केला होता. या सॅटेलाइट फोनचा मुख्य सर्व्हर सौदी अरेबियामध्ये असल्यामुळे तेथून आवश्यक माहिती किंवा मदत मिळत नाही. त्यामुळे हिंदुस्थानच्या जल हद्दीत थुराया सॅटेलाइट फोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुंबईत जुने जहाज भंगारात विकण्याचे काम विशालसिंग वाल्मिकी (२८) हा तरुण करतो. त्याने दुबईहून एमव्ही इब्बा हे थग जहाज मुंबईत आणण्यासाठी कॅप्टन आशिष प्रसाद प्रजापती (३४) याला पाठविले होते. त्यानुसार १३ जून रोजी प्रजापती ते थग घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाला. खराब हवामानामुळे प्रजापतीने विशालसिंगशी संपर्प साधण्यासाठी इनमारसेट हे सॅटेलाइट व्यवस्थित काम करीत नसल्याने थुराया सेटेलाईट फोनचा वापर केला. कधी मुंबईत पोहचणार आदी बाबत माहिती त्याने विशालसिंगला दिली. मात्र थुराया सॅटेलाइट फोनचा वापर होताच हिंदुस्थानच्या सॅटेलाइट यंत्रणेने ते बरोबर पकडले. तटरक्षक दलाने एमव्ही इब्बा हे थग जहाज ताब्यात घेऊन आशिष प्रसाद प्रजापती आणि विशालसिंग यां दोघाना येलोगेट पोलिसांच्या ताब्यात दिले.
चुकून वापर केला महागात पडला

दुबईतील सर्वच जहाजांवर थुराया सॅटेलाइटचा वापर होतो. पण हिंदूस्थानात त्याचा वापर करू नका असे दुबईतून येणाऱया जहाजावरील प्रत्येक कॅप्टनला सांगितले जाते. तसेच प्रजापतीला देखील सांगण्यात आले होते. मात्र इनमारसेट सॅटेलाइटचे नेटवर्प खराब असल्याने आशिषने चुकून थुरायचा वापर केला आणि लटकला. येलोगेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय करंबे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आशिष आणि विशालसिंग विरोधात इंडियन टेलिग्राफ अॅक्ट २०, २१ तसेच भादवि कलम २०१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. तसेच दुबईहुन आणलेले थग जप्त केले.