कर्नाकच्या शिळांचे केले जतन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटिशकालीन कर्नाक उड्डाणपुलाचे नाव कोरलेल्या सहा शिळांचे जतन करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म क्र.18 जवळील पी. डिमेलो मार्गाच्या दिशेने असलेल्या हेरिटेज गल्लीमध्ये या सहा शिळांचे जतन करण्यात आले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली.

मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद रेल्वे स्थानक या दरम्यान असलेला 154 वर्षे जुना कर्नाक उड्डाणपूल अलीकडेच जमीनदोस्त केला होता. 1868 साली बांधलेल्या या पुलाची लांबी 50 मीटर आणि रुंदी 18.8 मीटर इतकी होती. तर पुलाचे वजन अंदाजे 450 टन होते. पुलाच्या दोन्ही टोकांना पुलाचे नाव आणि बांधकामाचे वर्ष कोरलेल्या बेसॉल्टच्या शिळा होत्या. पूल जमीनदोस्त केल्यानंतर या शिळांचे जतन आता मध्य रेल्वेने केले आहे.