
सामना प्रतिनिधी । मुंबई
सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून यंदाच्या गुणवत्ता यादीत महाराष्ट्रातील एकही विद्यार्थी झळकलेला नाही. गुणवत्ता यादीत प्रथम येण्याचा मान देशातील चार विद्यार्थ्यांनी मिळविला आहे. या चारही जणांना ५०० पैकी ४९९ गुण मिळाले आहेत. प्रथम येणाऱया चौघांमध्ये तीन मुली असून परंपरेप्रमाणे याही परीक्षेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा दहावीचा एकूण निकाल ८६.७० टक्के लागला आहे. परीक्षेला बसलेल्या १६ लाख २४ हजार ६८२ विद्यार्थ्यांपैकी १४ लाख ८ हजार ५९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा तब्बल ३.३५ टक्क्यांनी अधिक आहे. या परीक्षेत ८८.६७ टक्के मुली तर ८५.३२ मुले उत्तीर्ण झाले आहेत.
विशेष गरजा असलेले
९२.५५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
विशेष गरजा असलेले ३ हजार ७६० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यांपैकी ३ हजार ४८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण ९२.५५ टक्के इतके आहे. या विद्यार्थ्यांपैकी अनुष्का पांडा आणि सान्या गांधी यांनी ४८९ गुण मिळवित प्रथम तर सौम्या प्रधानने ४८४ गुण मिळवित दुसरे स्थान पटकावले आहे. या विद्यार्थ्यांमध्ये १३५ विद्यार्थ्यांना ९० व त्यापेक्षा जास्त तर २१ विद्यार्थ्यांना ९५ व त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी
थिरुवनंतपुरम ९९.६०
चेन्नई ९७.३७ (महाराष्ट्राचा समावेश)
अजमेर ९१.८६
दिल्ली ७८.६२
या कारणांमुळे यंदाच्या परीक्षेला महत्त्व
तब्बल आठ वर्षांनंतर यंदा प्रथमच सर्व विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली.
परीक्षेचा निकालही ग्रेड म्हणजेच श्रेणीऐवजी यंदा टक्केवारीवर आधारित आहे.
आणि त्यापेक्षा जास्त टक्के मिळविणाऱया विद्यार्थ्यांचे प्रमाण २७ हजार ४७६ असून १ लाख ३१ हजार ४९३ विद्यार्थ्यांना ९० व त्यापेक्षा जास्त टक्के मिळाले आहेत.
हे आहेत गुणवंत
(५०० पैकी ४९९ गुण)
प्रखर मित्तल, डीपीएस, गुडगाव
रिमझिम अग्रवाल, आर.पी.पब्लिक स्कूल, बिजनोर
नंदिनी गर्ग, स्कॉटिश इंटरनॅशनल स्कूल, शामली
श्रीलक्ष्मी जी, भवन्स विद्यालय, कोचीन



























































