
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ई-परीक्षा’ ही वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेळापत्रक, प्रात्यक्षिक परीक्षा, परीक्षा केंद्र याची माहिती मिळणार असून विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीदेखील ऑनलाइन सोडविल्या जाणार आहेत.
cbse.gov.in/newssite वर जाऊन स्कूल ऑफिलेशन क्रमांक किंवा बोर्ड परीक्षेसाठी शाळेला दिलेला क्रमांक टाकल्यास विद्यार्थ्यांना वेबसाईटवर लॉग इन करता येईल. या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षेच्या केंद्रात झालेला बदल, बारावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत ग्रेड अपलोड करणे, दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत ग्रेड तसेच प्रात्यक्षिक परीक्षेची माहिती शिक्षकांना ऑनलाइन अपलोड करता येईल. सीबीएसई बोर्डाची दहावी व बारावीची परीक्षा 4 मेपासून सुरू होणार असून दहावीची परीक्षा 7 जून तर बारावीची परीक्षा 11 जूनपर्यंत सुरू राहणार आहे.




























































