वीकेण्डला घराबाहेर पडू नका, मध्य रेल्वे घेणार 36 तासांचा मेगाब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुढच्या आठवडय़ात 31 मे ते 2 जून या वीकेण्डला घराबाहेर पडू नका. महत्त्वाचे काम असेल तरच लोकलने प्रवास करा. कारण देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणास्तव मध्य रेल्वे तब्बल 36 तासांचा मेगाब्लॉक घेणार आहे. सीएसएमटी स्थानकात 24 डब्यांच्या रेल्वे गाडय़ांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 च्या विस्तारीकरणासंदर्भात प्री-नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वे मेगाब्लॉक घेणार आहे.

या मार्गावर वेळापत्रकात बदल

– सीएसएमटी ते वडाळा रेल्वे स्थानकादरम्यान अप धिम्या आणि अप डाऊन जलद मार्गावर शुक्रवारी 31 मेच्या रात्री साडेबारा वाजल्यापासून ते रविवारी 2 जून रोजी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत एकूण 36 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

– 31 मे रोजी 17702 हैदराबाद-सीएसएमटी हुसैन सागर एक्स्प्रेस, 12112 अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस, 17412 कोल्हापूर-सीएसएमटी महालक्ष्मी एक्स्प्रेस, 12290 नागपूर सीएसएमटी दुरान्तो एक्स्प्रेस, 12262 हावडा-सीएसएमटी दुरान्तो एक्स्प्रेस, 17611 नांदेड-सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस या गाडय़ा 31 मे रोजी रद्द असणार आहेत.

– काही मेल-एक्स्प्रेस गाडय़ा दादर स्थानकातच अंशतः रद्द करण्यात येणार आहेत.

या गाडय़ा सीएसएमटीऐवजी दादर स्थानकातून सुटणार

22177 सीएसएमटी-वाराणसी एक्स्प्रेस, 12051 सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, 22229 सीएसएमटी-मडगाव वंदे भारत ट्रेन, 22105 सीएसएमटी पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, 12859 सीएसएमटी हावडा गीतांजली एक्स्प्रेस, 12534 सीएसएमटी लखनऊ-पुष्पक एक्स्प्रेस, 12869 सीएसएमटी-हावडा एक्स्प्रेस, 22159 सीएसएमटी-चेन्नई एक्स्प्रेस, 11019 सीएसएमटी-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस, 22732 सीएसएमटी-हैदराबाद एक्स्प्रेस, 22221 सीएसएमटी निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस, 11401 सीएसएमटी अदिलाबाद नंदीग्राम एक्स्प्रेस, 12105 सीएसएमटी गोंदिया-विदर्भ एक्स्प्रेस या गाडय़ा सीएसएमटीऐवजी दादर स्थानकातून सुटणार आहेत. तर काही गाडय़ा पनवेल, पुणे आणि नाशिक स्थानकातून सुटणार आहेत.