अमरावती – चंद्रकांत वडनेरे यांचे दुःखद निधन

जिल्हातील शिवसेनेचे पहिले जिल्हा प्रमुख चंद्रकांतजी वडनेरे यांचे सोमवार दि. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता दुःखद निधन झाले.  अमरावती जिल्ह्यात शिवसेनेच्या बांधणीमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. जिल्ह्यातील शहरे आणि गावपातळीवर शिवसेनेच्या शाखा सुरू व्हाव्यात यासाठी त्यांनी कष्ट घेतले होते.  वडनेरे जिल्हाप्रमुख असताना प्रदीप वडनेरे व प्रकाश भारसाकळे हे शिवसेनेचे आमदार निवडून आले होते.   शिवसेनेच्या गाडगेबाबा नगर शाखेचे उदघाटन 2 ऑक्टोबर 1986 वडनेरे यांनी केले होते. त्यांच्या निधनानंतर शिवसेना नेते प्रदीप बाजड आणि जिल्ह्यातील समस्त शिवसैनिकांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या