लसीकरणासाठी चंद्रपूर महानगरपालिकेत लकी ड्रॉ योजना, मिळणार टीव्ही, फ्रिज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेने एक खास ‘लकी ड्रा’ योजना सुरु केली आहे. या योजनेमध्ये 12 ते 24 नोव्हेंबर दरम्यान लस घेणाऱ्या लोकांना ड्रा सिस्टीम द्वारे फ्रीज, LED टीव्ही आणि वॉशिंग मशीन  हे पहिल्या 3 क्रमांकासाठी तर 10 भाग्यवान विजेत्यांना मिक्सर दिले जाणार आहेत. यासाठी महानगरपालिकेच्या सर्व 21 लसीकरण केंद्रांवर ‘लकी ड्रॉ बॉक्स’ ठेवण्यात आले आहे. ज्यामध्ये लसीकरण झाल्यावर नागरिक त्यांचे प्रमाणपत्र टाकतील. ज्यातून शेवटी विजेत्यांची निवड होईल. चंद्रपूर शहरात आतापर्यंत 1 लाख 93 हजार लोकांनी पहिला तर 99 हजार लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोज घेतले आहे. मात्र अजूनही शहरातील 39 हजार नागरिक असे आहेत ज्यांनी कोरोना लसीचा एकही डोज घेतलेला नाही. या लकी ड्रॉ योजनेमुळे नागरिक कोरोना लस घेण्यासाठी प्रोत्साहित होतील अशी महानगरपालिकेला अपेक्षा आहे.