
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोरोना स्फोटानंतर परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. महाविद्यालयातील वरीष्ठ विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र सुरपाम यांच्याकडे प्रभार दिला जाण्याची शक्यता आहे.
रुग्णसुविधा उभारण्यावरून पालकमंत्री वडेट्टीवार आणि जिल्हाधिकारी हुमणे यांच्यावर नाराज होते. जिल्ह्यातील 7500 बाधितांपैकी 1000 रुग्ण हे गंभीर आहेत. जिल्ह्यात नव्या खाटा- ऑक्सिजनयुक्त बेड- व्हेंटिलेटर वाढ करण्यात हुमणे यांना अपयश आले. महाविद्यालयातील 500 कंत्राटी कामगार किमान वेतनाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 महिन्यांपासून डेरा आंदोलन करत आहेत. वैद्यकीय शिक्षण विभाग आणि कामगार विभागातील ताळमेळ नसल्याने कामगारांचा प्रश्न चिघळला आहे. त्यामुळे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे यांची तडकाफडकी बदली केली आहे.




























































