Chandrapur News – सर्पमित्रांची मोठी कामगिरी! दुर्मिळ ‘फोर्स्टेन कॅट स्नेक’ची जोडी सुखरूप रेस्क्यू; चंद्रपूर जिल्ह्यात सहावी नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्पमित्रांनी दुर्मिळ ‘फोर्स्टेन कॅट स्नेक’च्या जोडीला सुखरूप रेस्क्यू करून जीवदान दिल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या तळोधी -बाळापूर वनपरिक्षेत्रातील धामणगाव (माल) येथे घडली. या सापांच्या रेस्क्यूमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील या प्रजातीच्या नोंदींची संख्या सहावर पोहोचली आहे.

धामणगाव येथील आविष्कार दुबे यांच्या घरी साप आढळून येताच त्यांनी ‘स्वाब’ संस्थेशी संपर्क साधला. संस्था सदस्यांनी पाच ते सहा फूट लांबीचा एक फोर्स्टेन कॅट स्नेक ताब्यात घेतला. रेस्क्यू सुरू असतानाच जवळच्या झाडावर आणखी एक सात फूट लांबीचा साप आढळून आला. सर्पमित्रांनी अथक प्रयत्नांतून या दोन्ही सापांना सुरक्षितरीत्या जेरबंद केले. हा साप ‘निमविषारी’ असून शांत स्वभावाचा आहे. या जोडीला वन विभागाच्या उपस्थितीत सुरक्षित अधिवासात मुक्त करण्यात आले. तळोधी वनपरिक्षेत्रात या सापाची झालेली ही चौथी नोंद असून, हे निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जात आहे.