
अंगारक संकष्टी चतुर्थीमुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी मंगळवारी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्र्वभूमीवर शिवाजी रस्ता परिसरातील वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने ( फायरब्रिगेड,पोलीस वाहने,रुग्णवाहिका ) वगळता पीएमपीएल बसेस, आणि चारचाकी वाहनांना रस्त्यावर वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
वाहनचालकांनी स.गो.बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक-टिळक चौक- टिळक रोडने इच्छितस्थळी मार्गस्थ व्हावे. तसेच स.गो.बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी जंगली महाराज रोडने झाशी राणी चौक डावीकडे वळावे. लाल महाल चौकापर्यंत येणाऱ्या दुचाकी चालकांनी डावीकडे व उजवीकडे वळुन इच्छितस्थळी मार्गस्थ व्हावे. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणाऱ्या चालकांनी बाजीराव रोडने सरळ पुढे जाण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.




























































