सॉलिड लफडा; बायकोला फसवून गर्लफ्रेंडसोबत इटलीला गेला, कोरोनाची लागण झाल्याने फसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिझनेस ट्रिपला जातो असं पत्नीला सांगून गर्लफ्रेंडला इटलीलाला फिरायला नेणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून त्याच्यावर विलीगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. मात्र आता त्या तरुणाला कोरोनापेक्षाही त्याच्या पत्नीची जास्त भीती वाटत असून त्याने अधिकाऱ्यांना त्याच्या पत्नीला तो इटलीला गेला होता हे न सांगण्याची विनंती केली आहे.

इंग्लंडचा रहिवासी असलेला रॉबर्ट (नाव बदलले आहे) याने दोन आठवड्यांपूर्वी आपल्या पत्नीला युकेला बिझनेस ट्रिपला जातो असे सांगितले. त्यानंतर तो त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन इटलीला गेला. चीननंतर सर्वाधिक कोरोना व्हायरस पसरला असेल तर तो इटली या देशात आहे. या देशात गर्लफ्रेंडसोबत फिरत असताना त्याला कोरोना व्हायरसची लागण झाली. त्यानंतर तो त्याच्या घरीही गेला. मात्र सर्दी ताप खोकला अशी लक्षणं दिसून आल्यानंतर त्याला डॉक्टरांनी विलगीकरण कक्षात ठेवले. त्यानंतर त्याच्या पत्नीला देखील त्याच्याच घरात विलीगीकरणात राहण्यास सांगितले आहे. मात्र विलगीकरणात असलेल्या रॉबर्टला आता त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या व त्याच्यावर कधीच संशय न घेणाऱ्या पत्नीला त्याच्या अनैतिक संबंधाविषयी कळेल याची भीती वाटत आहे. त्यामुळे त्याची तपासणी करणाऱ्या प्रत्येक डॉक्टरला त्याने त्याच्या चुकीविषयी सांगून त्याच्या पत्नीला याबाबत काहीही सांगू नका अशी विनंती केली आहे.

हनीमूनवरून येताच पतीला कोरोनाची लागण, पत्नीची माहेरी धूम

आग्रा येथील एक महिला पतीसोबत हनीमूनसाठी इटली येथे गेली होती आणि नुकतीच बंगळुरूला परत आली. इटलीवरून आल्यानंतर वैद्यकीय चाचणीमध्ये पतीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच, पत्नीने माहेरी धूम ठोकली. फेब्रुवारीमध्ये या दाम्पत्याचा विवाह झाला होता. हनीमूनसाठी हे इटली येथे गेले होते आणि तेथून ग्रिस व फ्रान्सला गेले. 27 फेब्रुवारीला ते मुंबईला आले आणि तेथून बंगळुरुला. 7 मार्चला पतीला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. यानंतर पती-पत्नीला आयसोलेट करण्यात आले. परंतु महिलेने ही बाब वडिलांनी सांगताच त्यांनी तिला माहेरी बोलावून घेतले. 8 मार्चला महिला बंगळुरूहून विमानाने दिल्लीला गेली आणि तेथून रेल्वेने आग्राला पोहोचली.