
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसंच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे.
भुजबळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. भुजबळ यांनी केलेल्या पोस्टनुसार, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असून आपणा सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी बरा होईल. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की, कायम मास्क लावा आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या असं आवाहन त्यांनी केलं आहे.































































