अजित पवार गटात धुसफूस! भुजबळ नाराज तर, शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांना भेटले तटकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत दोन दिवसांपूर्वी रोड शो झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे अजित पवार गायब असल्याची चर्चा सुरू होती. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जंयत पाटील यांनी बाबात मोठी माहिती दिली आहे.

छगन भुजबळसाहेब नाराज आहेत हे आम्ही ऐकून आहोत. आणखी कोण नाराज आहेत, हे माहिती नाही, असं मोठं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा असताना आता सुनिल तटकरे यांच्याबाबतही चर्चा सुरू आहेत.

तेव्हा मोदी मला गुजरातला घेऊन जायचे, पण आता…; शरद पवारांचा मोदींवर निशाणा

नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते. तिथे अजित पवार गटातील बडे नेते सुनिल तटकरे येऊन गेले, असा दावा करण्यात येत आहे. शरद पवार यांच्या पक्षातील नेते मोठे अनिल देशमुख यांनी हा दावा केला आहे. तटकरेंची आमच्या काही कार्यकर्त्यांशी भेटही झाली, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं. मात्र, सुनिल तटकरे आमच्या संपर्कात नाहीत. ते आमच्या संपर्कात आले तरीही आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही, असंही अनिल देशमुख म्हणाले.

शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना गुडघे टेकायला लावणार! नाशिकच्या विराट सभेत उद्धव ठाकरे कडाडले