
जगदंबा तलवारी पाठोपाठ आता शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघ नखे ब्रिटनमधून महाराष्ट्रात परत आणण्यात येतील, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तसेच शिवराज्याभिषेक दिनाल 2024 साली 350 वर्षे पूर्ण होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. शिवरायांनी वापरलेले वाघ नख परत मिळावीत यासाठी महाराष्ट्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

























































