चीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने

हिंदुस्थाननंतर चीनने आता नेपाळच्या जमिनीवर कब्जा केला आहे. म्हणून नेपाळी नागरिकांनी चीन विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली आहे.

आम्ही कुणाच्या जमिनीवर कब्जा केला नाही, आम्हाला युद्धात रस नाही अशी भुमिका चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी कालच घेतली होती. आता नेपाळच्या जमिनीवर त्यांनी कब्जा केला आहे. नेपाळच्या हुम्ला जिल्ह्यातील दोन किमी जवळ चीनच्या सैनिकांनी बांधकाम केले आहे. तसेच नेपाळी नागरिकांना या भागात चीनी सैनिकांनी मज्जाव केला आहे.

धक्कादायक! लडाखमध्ये हिंदुस्थानची 38 हजार स्क्वेअर किलोमीटर जमीन चीनकडे!! संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची कबुली 

नेपाळच्या हुला जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालायजवळून लाप्चा भागात चीनने अनधिकृत इमारती बांधल्या आहेत. ज्या भागात इमारती बांधल्या आहेत त्या चीनच्या भूभागात असल्याचा चीनच्या सैनिकांनी केला आहे.

नेपाळचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले पण त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. तसेच चीनच्या दुतावासाकडून एक अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात चीनने अतिक्रमण केल्याचा दावा फेटाळला आहे. तसेच याबाबत जी काही चर्चा असेल ती सीमेवरच होईल, नेपाळकडे या जमिनीविषयी जे काही कागदपत्रे असतील ते त्यांनी दाखवावे अशी भुमिका चीनने घेतली आहे.

चीनला कुठल्याही प्रकारच्या युद्धात रस नाही- राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 

दोन महिन्यांपूर्वी चीनने नेपाळच्या गोरखा जिल्ह्याती रुई गावावार कब्जा केल्याचे वृत्त होते. तेव्हा नेपाळमध्ये गदारोळ झाला होता. जूनमध्ये विरोधी पक्षानी नेपाळच्या संसदेत मागणी केली की चीनने जी जमीन ताब्यात घेतली आहे ती पर घ्यावी.  चीनने नेपाळच्या हुमला, दोलका, सिंधुपालक चौक, संखुवसाभा, गोरखा आणाइ रसूवा जिल्ह्यातील 64 हेक्टर जमीनीवर अतिक्रमण केले आहे असा आरोप नेपाळच्या विरोधी पक्षांनी केला आहे. परंतु नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ग्यावली यांनी अशा प्रकारे कुठलेच अतिक्रमण झाले नसल्याचे म्हटले आहे. तसेच चीनसोबत कुठेलाच सीमावाद नसल्याचे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या